विद्यार्थी हितार्थ अभिनव उपक्रम:

विध्यार्थी कल्याण निधी शिष्यवृत्ती योजना 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाच्या माध्यमातुन संलग्न महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता. गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती देण्यात येते. पदवी स्तरावर रु १००० वार्षिक शिष्यवृत्ती खालील निकष पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येते.

  • ५०% पेक्षा अधिक गुणाने उत्तीर्ण होणारा असा विद्यार्थी जा शासनाव्दारे दिल्या जाणाऱ्या इतर शिष्यवृत्ती जसे जी.वाय.ओ., ओबीसी इ. सवलतीव्दारे शिष्यवृत्तीचा लाभ घेत नाहि.
  • एच.एस.सी नंतरचा अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सहकारची शिष्यवृत्तीअनुसुचित जाती जमाती व भटक्या अन्य आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या एच.एस.सी नंतरचा अभ्यासक्रम घेणा-या विद्यार्थ्याना भारत सरकारची शिष्यवृत्ती संचालक, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिली जाते. खालील अपवाद वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळु शकते.

अर्जाची अंतिम तारीख : ३१ जुलै

अर्जासोबत जोडवतयाचे आवश्यक कागदपत्रे:

1)गुणपत्रिका

२) उत्पनाचा दाखला (१,००,००० उत्पन्न मर्यादा) सक्षम अधिकारी तलाठी, तहसीलदार)

३) इतर उपक्रम प्रमाणपत्र एनएसएस., एनसीसी., सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व क्रिडा इ. उपक्रम.

शिष्यवृत्ती:-शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाची (online)

नोंदणी करणे आवश्यक राहिल.

१)एक व्यावसायीक अभ्यासक्रम पुर्ण करुन दुसऱ्या व्यवसायीक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहि.

२)वर्षिक परीक्षेत नापास होणाऱ्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.

३)सभ्याकसक्रमाना पुन्हा शिष्यवृत्ती मिळणार नाही.

४)एका पालकाच्या फक्त दोनच मुलांना शिष्यवृत्ती मिळु शकते.

५)हि सवलत घेणऱ्या विद्यार्थ्याची उपस्थिती ७५% आवश्यक आहे. ज्यांची उपस्थिती ७५% राहणार नाहि त्यांना सवलत  नाकारण्यात येईल.

६)सवलतीच्या अर्जातील काहिती चुकिची आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी अर्ज करणारे विद्यार्थी आणि पालक यातर राहिल.

७) एच.एस.सी उत्तीर्ण झाल्यावर किंवा कोणत्याही पात्रतेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी ज्याचा एक किंवा अधिक वर्षाचा खंड पडला असेल त्यांनी या सवलतीच्या अर्जासोबत त्या कालखंडात अर्जासोबत त्या कालखंडात कोणतेही शिक्षण न घेतल्याने ॲफिडेव्हिड घावयास पाहिजे.

८) फी सवलत मिळाल्यास १,००,००० रु चे उत्पन्न असणऱ्याना खालील शुल्क माफ राहिल. इतर शुल्क त्यांना भरावे लागेल.

१) शिक्षण शुल्क

२) ग्रंथालयाचे शुल्क

३) अभ्यासेत्तर कार्यासाठी

९) अनुसुचित जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना फी माफि समाज कल्याण अधिकारी, जि.प. अमरावती/नागपुर यांचे मार्फत दिली जाते. (विद्यार्थी फक्त एकदाच वर्गात अनुत्तीर्ण झालेला असावा)

त्यांना खाली शुल्क माफ राहिल. इतर शुल्क त्यांना भरावे लागेल.

शिष्यवृत्ती अर्ज करण्याची पध्दती

सर्व मागास वर्गाच्या व कमी उत्पन्नाच्या वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी महावि़द्यालयामार्फत जुनमध्ये अर्ज करावेत. अर्ज सर्व दुष्टीने पुर्ण असावा. अपुर्ण किंवा खोटी माहिती दिल्यास त्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल. ज्यांच्या शिक्षणात खंड(गॅप) पडला असेज त्यांनी त्याकाळात ते काय करीत होते संबंधीचे ॲफिडेव्हीट देणे आवश्यक आहे.

बी.ए. भाग १ या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती साठी online अर्ज भरावेत अनुसुचीत जाती, भटक्या जमाती आदींना त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर शिष्यवृत्ती मिळते. (पावती Hard copy महाविद्यालयात सादर करावी)

∙१,००,००० चे आत वार्षिेक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शुल्क सवलत मिळते त्यासंबंधी महत्वाच्या सुचना.

  • ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १,००,००० रु चे आत आहे. अशा विद्यार्थ्यानी ठराविक नमुन्यात उत्पन्नाच्या दाखल्यासह अर्ज केल्यासस त्यांना फि सवलत मिळु शकते.
  • ज्या विद्यार्थ्याचे वय १८ वर्षाचे आत आहे अशा विद्यार्थ्यांनी वडीलांच्या किंवा आई/वडील नसल्यास पालकांच्या सहीने फि सवलतीसाठी अर्ज करावा अन्यथा सवलत नाकरण्यात येईल. आई/वडील यापैकि कोणी हयात नसतील तर त्यांच्या मृत्यु चा दाखला जोडावा लागेल.
  • प्रवेश घेतानाच फि सवलतीचा अर्ज द्यावा.
  • बी.ए. प्रथम तसेच व्दितीय वर्गातुन वरच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी वत्र चाजु झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत नवीन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • प्रवेश अर्जावर कायदेशीर पालक म्हणुन ज्यांचे नाव असेल त्यांचेच सहीने फि माफिचा सवलतीचा अर्ज करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजना:

अपघात झालेल्या विद्यार्थ्यास शैक्षणिक वर्षातील कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त १०००/- पर्यंतचा लाभ घेता येईल. संबंधित विद्यार्थ्यांने किंवा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाने वा पित्याने प्रायार्याकडे आवश्यक पुराव्यानिशी कागदपत्रासोबत अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घेता येईल. प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्याकडुन रु. १.०/- रकमेतुन सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

स्व.राजीव गांधी विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजना:

महाराष्ट्र शासनाव्दारे सदर योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. महाविघालयातील विद्यार्थ्याचा रु. ५०० प्रमाणे विमा रक्कम शासन स्वरावर एकमुस्ती जमा करुन शैक्षणिक वर्षाकरीता कमीत कमी ७००/- जास्तीत जास्त ३०००/- चा लाभ अपघातग्रस्त विद्यार्थ्यांस घेता येतो. आवश्यक कागदपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज प्राचार्या मार्फत सादर करुन सदर योजनेचा लाभ घेता येईल.