प्रा. राजाभाऊ देशमुख  कला महाविद्यालय – एक दृष्टीक्ष्रेप     

संत व सामाजिक पुढाऱ्यांची कर्मभुमी असलेल्या अमरावती जिल्हयांमध्ये नांदगाव खंडेश्वर हे एक ऐतिहासिक पार्श्वभुमी असणारे गाव नजिकच असलेल्या पापळ येथे शिक्षण महर्षी डॉ भाऊ साहेब उपाख्य, पंजाबराव देशमुख  यांच्या जन्म भुमीचा उज्वल वारसा लाभलेल्या परीक्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाचे दालन सर्व सामान्य जनांच्या मुलांना उघडण्यात यावे या प्रांजळ भूमिकेतून  संस्थेच्या सर्व संस्थापक  सदस्यांनी १९९० साली कला महाविद्यालयाच्या रुपात नांदगाव खंडेश्वर येथे मुहुर्त मेढ रोवली. अमरावती रोड वरील मोकळया हवेशीर निसर्गम्य परीसरात प्रशस्त इमारतीमध्ये महाविद्यालय सुरु आहे.

महाविद्यालयाने अगदी कमी कालावधीत शैक्षणिक मैलाचे दगड पार केले आहे. जसे विद्यापीठाचे कायम संलग्नीकरण, बंगरच्या नॅक व्दारे प्रमाणिकरण आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व्दारा १२ (B), २(F) चा दर्जा ग्रामीण भागातील एक दर्जा असलेली शैक्षणिक संस्था म्हणुन पुढे येण्याचा सांधिक प्रयत्न सुरु आहे.

नामांकन अर्ज

विद्यापीठाचे परीक्षेस प्रथम बसणऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नामांकन अर्ज भरणे आवश्यक आहे. एकदा नामांकन अर्जात लिहलेला विषय कोणत्याही परीक्षेत बदलविता येणार नाहि.

महाविद्यालयीन परीक्षा

अमरावती विद्यापीठ नियमाप्रमाणे महाविद्यलयातील घेण्यात येणाऱ्या घटक चाचण्यास प्रत्येक विद्यार्थ्यांने बसणे आवश्यक आहे. कमीत कमी २०% गुण मिळविणे आवश्यक आहे.किमान गुण मिळविण्यास पात्र न ठरल्यास दंड आकारण्यात येईल.

 

महाविद्यालयाचे सर्व सामान्य नियम

  • माहिती पात्रकातील सर्व बाबींवरील नियमांचे अवलाकन करुन त्याचप्रमाणे त्याची पूर्तता करावी.
  • सुचना फलकावर लावलेल्या सुचनांचे आवर्जुन पालन करावे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्तणूक  महाविद्यालय वरीसर तसेच बाहेरसुध्दा सौजन्यपुर्ण असावी व शिस्तीचे पालन करावे.
  • गैरवर्तन व बेशिस्त आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करुन त्यास निष्कसित करण्यात येईल
  • महाविद्यालयाचे माहितीपत्रकात असलेल्या तसेच सुचना फलकावर लावलेल्या सुचनांचा अनादर किंवा भंग किंवा विदयार्थ्याची त्रासदायक वर्तणूक प्राचार्य, प्राध्यापक, किंवा कार्यालयीन कर्मचा-यांच्या सूचना्ंची अवहेलना, दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही  कृती, महाविदयालयाच्या  संपत्तीचे जाणिवपूर्वक नुकसान, राष्ट्रीय कार्यक्रमात अनुपस्थिती तसेच तत्सम बाबी गैरवर्तन  समजण्यात येतील.
  • महाविदयालयात वेळोवेळी होणा-या स्पर्धा व कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांनी उपस्थित राहावे.
  • आपली वेशभूषा स्वच्छ व निटनेटकी व सभ्यतापूर्वक असावी.