प्रवेश पात्रता

कला विभाग

वाड़:मय स्नातक भाग १ (बी.ए भाग १)

या वर्गात १२ वी कला, वाणिज्य, किंवा विज्ञान परीक्षा  उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

वाड:मय स्नातक भाग २ (बी.ए. भाग २)

बी.ए. भाग १ ची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

(ए.टी.के.टी. ची सवलत राहील.)

वाड:मय स्नातक भाग ३ (बी.ए. भाग ३)

बी.ए. भाग २ ची परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

(ए.टी.के.टी. ची सवलत राहील.)

प्रवेश अर्ज

अर्ज मिळण्याचे ठिकाण व इतर माहिती

प्रवेश अर्ज व माहिती पत्रक महाविद्यालयाच्या कार्यालयातुन प्राप्त करता येतील. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे व फी सह कार्यालयात देऊन पावती घ्यावी. अर्जावर रंगीत पासपोर्ट फोटो जोडावा (दोन प्रती)

 • विद्यार्थ्यानी अर्ज संपुर्ण माहितीसह भरुन घावा अपुर्ण माहिती असलेला अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही.
 • प्रवेश अर्जासाबत खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
 • पात्रता परीक्षा पास झाल्याची गुणपत्रिका
 • शाळा किंवा महाविघालय सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी)
 • जातीचे प्रमाणपत्र
 • विहित नमुन्यात फह माफीचा अर्ज व सक्षम अधिकाऱ्यांने प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला(तहसीलदार) सर्व आवश्यक कागदपत्राच्या तीन सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात त्वरीत सादर करावा.
 • आधार कार्ड.
 • ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या मुळप्रतीसह जन्मतारीख व जात ळया बाबी स्पष्ट बसाव्यात. खेडताड असल्यास प्रवेश नाकारण्यात येईल.
 • अनुसुचित जाती व जमातीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळी कार्यकारी दंडाधिकारी यांचे सही व शिक्यासह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • प्रवेश निश्चित झाल्यावर मुळ कागदपत्रे कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाहित.
 • एकाच विद्याशाखेत विषय बदलावयाचे असल्यास प्रवेश घेतल्यापासुन जास्तीत जास्त दहा  दिवसांचे आत प्राचार्यांची परवानगी आवश्यक आहे. या संबंधात विनंती  अर्ज उपराक्त कार्यालयात सादर करावा.

 

अनुसुचित जाती व जमातिसाठी राखीव प्रवेश

 • अनुसुचित जाती व नवबौध्द १३%
 • अनुसुचित जमाती ७%
 • भटक्या व विमुक्त जाती व जमाती ८%
 • इतर मागासलेले वर्ग १९%
 • अनंगाकरीता ३%
 • विशेष मागास प्रवर्ग २%

ओळखपत्र

प्रवेश घेतेवेळी आपले ओळखपत्र तयार करुन त्यावर प्राचार्यांची सही घेणे बेधनकारक आहे. विद्यार्थ्याने आळखपत्रासाठी आपला पासपार्ट साईजचा फोटो प्रवेश घेतेवेळी महाविद्यालयात सोबत आणावा. महाविद्यालयात विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्राच्या आधारावर दिल्या जातील. व़िद्यापीठ व बोर्डाच्या वार्षिक परीक्षेसाठी ओळखपत्र आवश्यक राहिल. महाविद्यालयात सुध्दा प्रत्येकाने ओळखपत्र सोबत बाळगावे.